नाशिक– शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या वतीने आज सकाळी नाशिकच्या तिडकेनगर, कर्मयोगीनगर, नंदिनी नदीकाठी दोंदे पूल अशा पाच ठिकाणी वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. नंदिनी नदीकाठी त्यांनी स्वत: खड्डे खोदून वृक्षारोपण करीत संवर्धनाचाही संकल्प केला आहे.
शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने विविध उपक्रमांच्या माध्यमातून नंदिनी नदीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. प्रदुषणमुक्तीसाठी पुलांना संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणीही महापालिका आयुक्तांकडे त्यांनी निवेदनाद्वारे ३१ मे रोजी केली आहे. आज जागतिक पर्यावरण दिनी नंदिनी नदीकाठावरील दोंदे पूल येथील अनमोल व्हॅलीजवळ वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. तसेच प्रियंका पार्क, तिडकेनगर, कर्मयोगीनगर येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर आणि रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण केले. यात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फावडे हाती घेत खड्डे खोदण्यापासून ते वृक्षारोपण करण्यात महिला आघाडीवर होत्या. याचबरोबर ज्या रहिवाशांनी रोपांची मागणी केली, त्यांना ती उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
दै. ‘सामना’चे पत्रकार, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना महिला आघाडी कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, चंद्रकिशोर पाटील, डॉ. राजाराम चोपडे, यशवंत जाधव, श्रीकांत नाईक, निलेश ठाकूर, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख), बाळासाहेब दुसाने, विनोद पोळ, सुधीर पाटील, बाळासाहेब राऊतराय, मनोज बागुल, रूपेश सोनवणे, डॉ. अजित वराडे, डॉ. आर. ओ. पाटील, शैलेश महाजन, संजय टकले, सुरेश पाटील, कांतिलाल उबाळे, बापूसाहेब पानपाटील, वैभव कुलकर्णी, संदीप कासार, परेश येवले, विजय शिरोडे, मुकुंद रनाळकर, अरुण ठाकरे, राहुल शिंदे, दीपक दुट्टे, सुरेखा बोंडे, कांचन महाजन, नीलिमा चौधरी, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, धवल खैरनार, वंदना पाटील, साधना कुवर, संगीता आहेर, कुसुम खळदकर, संगीता देशमुख, पल्लवी रनाळकर, सरीता पाटील, सुनिता उबाळे, तनिष्का गायकवाड (देशमुख), रजनी जाधव, संगीता नाफडे, रेखा भालेराव, किरण पवार, कविता वडघुले, कल्पना सूर्यवंशी, सोनाली चौधरी आदींसह रहिवाशी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापालिका, सॅमसोनाईटचे आभार
शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या वृक्षारोपणासाठी महापालिकेने रोपे दिली. इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथील सॅमसोनाईट कंपनीने रोपांबरोबरच तीस ट्री गार्डही दिले. या सहकार्याबद्दल शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनने आभार मानले आहेत.