नाशिक- शिवसेना नगरसेवकांचे या पंचवार्षिकमधील कार्य उल्लेखनीय आहे. अभ्यासू आणि आक्रमक पद्धतीने ते आपले प्रश्न मांडतात असे मी स्वतः सभागृहात बघितले आहे. आता एक वर्ष शिल्लक असल्याने नगरसेवकांनी विकास कार्याद्वारे आपली आणखी जबरदस्त छाप पाडावी, असे प्रतिपादन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.
महानगर प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी बैठकांचा धडाका लावला असून त्याचाच एक भाग म्हणून शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित नगरसेवकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख आ. विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदी होते.
महापालिकेत शिवसेना आज विरोधी बाकांवर बसलेली आहे. प्रबळ विरोधी पक्ष काय असतो हे शिवसेनेने आपल्या कार्याद्वारे दाखवून दिले आहे. त्यामुळेच भाजपाला मनमानी कारभार करता आला नाही व त्यांच्या बेबंदशाहीला बाळा बसला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या विकास निधीबाबत अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु शिवसेनेच्या अभ्यासू नगरसेवकांनी तो हाणून पाडला. विकास कामांच्या बाबतीत शिवसेनेचे नगरसेवक कुठेच कमी नाहीत. आपापल्या प्रभागाच्या विकासात नगरसेवकांनी मोलाची भर घातली आहे. नगरसेवकांना जी पदे मिळाली त्याला पुरेपूर न्याय देण्याचा त्यांनी निश्चितच प्रयत्न केला आहे. आता वेळ कमी आहे उर्वरित कालावधीत आपल्याला आपापल्या प्रभागात महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून २०२२ च्या निवडणुकांना मोठ्या धैर्याने सामोरे जायचे आहे. या निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक जागा जिंकून सत्ता काबीज करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळेच जनतेच्या प्रश्नांना सामोरे जा. त्यांच्यात मिसळा. त्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि ते सोडविण्याचा प्रयत्न करा. राज्यात शिवसेना प्रणित महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळली आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांत शिवसेनेला अनुकूल वातावरण असल्याने त्याचा लाभ उचलण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोतच पण त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे आणि ती निश्चितच मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो, असेही बडगुजर यांनी पुढे सांगितले. जिल्हाप्रमुख आ.विजय करंजकर यांनी मार्गदर्शन करताना नगरसेवकांना आपापल्या प्रभागात जबरदस्त काम उभे करण्याचे आव्हान केले. एकदिलाने काम केल्यास महापालिकेवर शिवसेनेचा एकहाती भगवा आपण निश्चितच फडकवू शकतो यात तिळमात्रही शंका नसल्याचे करंजकर पुढे म्हणाले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मार्गदर्शन करतांना नगरसेवकांना जमिनीवर राहून काम करण्याचे आवाहन केले.नागरिकांच्या छोट्या छोट्या तक्रारींची दाखल घेऊन त्याचे निरसन करावे,असेही बोरस्ते पुढे म्हणाले.माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नगरसेवकांना लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. दुखावलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांची नाराजी दूर करावे.संघटनाबांधणी चांगली करा असेही गायकवाड पुढे म्हणाले.प्रास्ताविक गटनेते विलास शिंदे यांनी केले.यावेळी आपल्या सूचना मांडताना नगरसेवकांनी दोन सदस्यीय प्रभाग रचनेवर भर दिला.मागील वर्षी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या.निवडणुकीसाठी आतापासूनच प्रभावी यंत्रणा उभारावी, शिवसेनेने केलेल्या ठोस कामांची यथायोग्य प्रसिद्धी व्हावी,जेथे पक्षाचे संघटन कमकुवत असेल तेथे ते अधिक मजबूत करावे,पेजप्रमुख संकल्पना राबवावी,सहा विभागप्रमुख नेमा,सत्ताधारी पक्ष मनमानीपणे प्रभाग रचना करणार नाही याची काळजी घ्यावी आदी सूचनाही यावेळी नगरसेवकांनी केल्या.
यावेळी डी. जी. सूर्यवंशी, सूर्यकांत लवटे, कल्पना पांडे, प्रवीण तिदमे, प्रशांत दिवे, हर्षा बडगुजर, संतोष गायकवाड, मधुकर जाधव, संगीता जाधव, मंगल आढाव, जयश्री खर्जुल, पुनम मोगरे, सुवर्णा मटाले, ॲड. श्यामला दीक्षित, ज्योती खोले, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, दीपक दातीर, सीमा निगळ, भागवत आरोटे, नयना गांगुर्डे, रत्नमला राणे, किरण गामणे, संतोष साळवे, सुनील गोडसे आदी उपस्थित होते.