दिंडोरी – तालुका शिवसेनेचे कार्यकारिणीत बदल करण्यात आला असून दिंडोरी तालुकाप्रमुख पदी शिवसैनिक पांडुरंग गणोरे यांची तर जिल्हाउपप्रमुख पदी पस सदस्य कैलास पाटील व नाना मोरे (दिंडोरी पश्चिम व पेठ) यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच या निवडीचे पत्र शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत, समनव्यक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले.
कट्टर शिवसैनिक म्हणून पांडुरंग गणोरे यांची ओळख असून हे १९६ साली शिवसेना शाखेच्या विद्यार्थी सेनेचे शाखाप्रमुख झाले, त्या शाखेत कट्टर शिवसैनिकांची फळी तयार करुन संघटनेचे काम करत पक्ष कार्य केले, त्यानंतर २००५ साली विभागप्रमुख, २०१० साली उपतालुकप्रमुख व २०१९ ला नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून गणोरे यांची नियुक्ती झाली, पक्षाचे सर्व आदेश मानुन काम करताना अनेक तरूण पक्षाशी जोडण्याचे व टिकवण्याचे काम त्यांनी केले, यासाठी पक्ष नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, पक्षाबंधणीचे चांगले काम केले, याची पक्षनेत्यांनी दखल घेऊन गणोरे यांच्यासारख्या तरूणाला तालुकाप्रमुख पदी काम करण्याची संधी बहाल केली आहे तसेच जिल्हाउपप्रमुख पदी पस सदस्य कैलास पाटील व बाजार समिती संचालक नाना मोरे (दिंडोरी पश्चिम व पेठ) यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर, सुरेश डोखळे, सतीश देशमुख, आदींनी स्वागत केले.