नाशिक – कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविल्याचे पडसाद राज्याच्या विविध भागात उमटत आहेत. नाशिकमध्येही शिवप्रेमींनी जोरदार निदर्शने केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचा पुतळ्याला जोडे मारुन जोरदार घोषणाबाजी केली. गावात तत्काळ पुन्हा पुतळा साकारावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.








