शिर्डी – साईबाबांच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता दररोज १५ हजार भाविकांना मंदिरात दर्शन दिले जाणार आहे. मात्र, कोरोनासाठी राज्य सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळणे भाविकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळूनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान, दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढविल्याने देशाच्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.