नवी दिल्ली – लॉकडाउनच्या काळात असंख्य लोकांना मदतीचा हात दिल्याने अभिनेता सोनू सुदचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. संतोष चौहान नावाच्या व्यक्तीने ट्विटरद्वारे सोनू कडे मदत मागितली होती.
उत्तरप्रदेश येथील मिर्जापुर आणि सोनभद्र या जिल्ह्यातील मुलींना पाचवी नंतर शाळा सोडावी लागते, गावातील ३५ मुलींना ८ च्या पुढील शिक्षणासाठी १५ कोलोमीटरचे घनदाट जंगल पार करून जावे लागते अशा आशयाचे ट्विट करण्यात आले.
संबंधित रस्ता हा नक्षलवाद प्रवण क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणावर मुलींच्या जीवाला धोका आहे असे यात म्हटले आहे. याच भीतीमुळे पालक विद्यार्थिनींना शाळेत पाठवण्यात तयार होत नाही. जर मुलींना सायकल मिळाली तर त्यांना पुढील शिक्षणासाठी जाता येईल अशी मदत संतोष यांनी सोनूकडे मागितली होती. यामागणीवर सोनू सूदयांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ‘गावातील सर्व मुलींना सायकल मिळेल, कोणाचेही शिक्षण थांबणार नाही’ असे त्याने म्हटले आहे. त्यांच्या या मदतीमुळे मुलींना पुढील शिक्षण घेता येणार आहे.