नाशिक – शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. १ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान गो कोरोना फिटनेस चॅलेंज शिक्षकांसाठी ठेवण्यात आले. या चॅलेंज मध्ये ४० शिक्षकांनी सहभाग घेतला. सोळा शिक्षकांनी यशस्वीपणे कोरोना च्या काळात घरीच योगा इतर व्यायाम प्रकार करून आरोग्याची काळजी घेत चॅलेज पूर्ण केले. त्यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. इतर स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन संजय पवार व डॉ आबा पाटील यांनी केले. ५ सप्टेंबर शिक्षक दिन व गणेश चतुर्थी निमित्त शमी गणपती ओढा येथे नाशिक सायकलिस्ट, शहर व ग्रामीण भागातून रायडर्स या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. चतुर्थी रायडर्स, नाशिक सायकलिस्टच्या वतीने शमी गणपती देवस्थानाला पंचवीस खुर्च्या भेट देण्यात आल्या. शिक्षकांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी सरपंच विष्णू पेखळे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नाशिक सायकलिस्ट रवींद्र दुसाने, चंद्रकांत नाईक, श्रीराम पवार, वराडे, कैलास बोडके, किशोर माने, निवृत्त शहर अभियंता उत्तम पवार, लायन्स क्लब अध्यक्ष रमेश पवार , रामदास सोनवणे, सायखेडा दूध डेअरी पॉवरचे संचालक सोमनाथ खरात आदी उपस्थित होते.