दिंडोरी – शिक्षक दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा वनारवाडी ग्रामस्थांनी सत्कार केला. हा उपक्रम स्तुत्य व आदर्शवत असून इतर गावांसाठी देखील मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन दिंडोरीचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी केले.
वनारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित शिक्षक गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख अतिथी होते. व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांमध्ये प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपसरपंच दत्तात्रय भेरे, बंडूभाऊ भेरे, भास्कर घोलप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद भेरे यांचा समावेश होता.
शिक्षकदिन कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जनता विद्यालय दिंडोरीचे आदर्श शिक्षक संतोष कथार, वनारवाडी शाळेतील भाऊसाहेब नांदूरकर, सुनंदा घोलप, सुनंदा अहिरे, जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त विलास जमदाडे आदींचा शाल, पुष्पगुच्छ व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन ग्रामसेविका आश्विनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद चव्हाण, यादव डमाळे, अरूण चव्हाण, गुलाब ठाकरे, शिवाजी डमाळे, रूंजा ठाकरे, विश्वास चव्हाण, बापू भेरे, हेमराज वाघमारे, राजाराम राऊत, गोरख डमाळे, बापू मिसाळ, नितीन ठाकरे, नाना सातपुते, अमोल घोलप, एकनाथ भेरे, दौलत लहांगे,
छाया राऊत, सरला डमाळे, जीजा भेरे, संगीता मोरे, ललिता देशमुख, हिराबाई मिसाळ, सुनिता बच्छाव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.