टोकियो – जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त जपानी माध्यमांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. आजारपणामुळे आता त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा जपान येथे सुरु होत्या. आबे यांना गेल्या आठवड्यात दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जपानमधील एनएचके टेलिव्हिजन आणि तेथील स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या रिपोर्टनुसार, शिंजो आबे यांनी आरोग्याच्या अस्वस्थेतेमुळे पंतप्रधान पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. आबे यांनी २००७ मध्येही पहिल्या कार्यकाळात देखील आरोग्याच्या कारणास्तव पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. गेल्या सोमवारी शिंजो आबे यांनी पंतप्रधान कार्यकाळाची ८ वर्ष पूर्ण केली आहेत. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिंजो आबे यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. जपान व भारत मित्रराष्ट्र असून शिंजो आंबे यांच्या कार्यकाळात भारताला त्याचा फायदा होत आहे.