नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पगार यांची कन्या चि. सौ.कां. दिशा व श्री.विश्वास शिंदे यांचे सुपुत्र चि. प्रसाद यांचा शुभविवाह आज नाशिक येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ या सोहळ्यास उपस्थित होते.भुजबळ साहेबांनी यावेळेस उभयंताना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या भावी उज्वल वाटचालीस सदिच्छा दिल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांची मुलगी दिशा व विश्वास शिंदे यांचे चिरंजीव प्रसाद यांचा विवाह अगदी मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन ॲानलाईन पद्धतीने हजारो नेटकऱ्यांनी या विवाहास हजेरी लावत वधुवरांना आशीर्वाद दिले.
नाशिक येथे संपन्न झालेल्या या विवाहास राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख, पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ, राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री ना.नवाब मालिक, माजी मंत्री आ.भास्करराव जाधव, माजी खासदार समीर भुजबळ, आ.सुनिल भुसारा, आ.दिलीपराव बनकर, आ.माणिकराव कोकाटे, आ.हिरामण खोसकर, आ.सरोजताई आहिरे, जेष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, माजी आमदार अनिल कदम, दिपीका संजय चव्हाण, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, पोलिस आयुक्त दिपक पांडे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डाॅ.सयाजी गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.