- डांगसौंदाणे – शासनाच्या नरेगा सारख्या योजना असतील किंवा पाणी पुरवठा योजना कुपोषण असेल अशा सर्व योजना स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जर पूर्ण केल्यात तर घराघरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा हा प्रत्यक्षात आपल्याला डोक्यावरून उतरलेला दिसेल असा आशावाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी आज बागलाण दौऱ्यावर असतांंना पंचायत समिती सभागृहात अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत व्यक्त केला .यावेळी त्या म्हणाल्या की, अधिकाऱ्यांनी कुठलीही पाणीपुरवठा योजना असेल तर ती योजना फक्त गावात पाणी आणि पर्यंत मर्यादित न ठेवता गावातील प्रत्येक घरात नळाचे कनेक्शन आहे का हे तपासूनच ठेकेदाराचे अंतिम बिल दिले पाहिजे. कुपोषण हे शुन्यावर आणणे ही आपली जबाबदारी आहे.यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, पंचायत समिती प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ दिला तर नक्कीच भविष्यातील गरीब कुटुंबांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर घटलेली दिसून येईल व खऱ्या अर्थाने विकास झाल्याचे चित्र आपणा सर्वांना दिसेल
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या श्रीमती बनसोड यांच्या दौऱ्याला मंगळवारी ठेंगोडे गावापासून सुरुवात झाली सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर ठेंगोडे येथील फडकी उद्योग केंद्रास भेट देऊन स्थानिक रोजगार जाणून घेतला. यानंतर चिणार शासकीय विश्रामगृहवर तालुक्याच्या ग्रामीण भागाची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती जाणुन घेत पंचायत समितीच्या भिकन जयाजी सभागृहात पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख ,सभापती, उपसभापती ,स्थानिक जि .प सदस्य व पदाधिकारी यांच्यात स्थानिक कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी पंचायत समितीच्या वतीने सभापती इंदुबाई ढुमसे यांनी श्रीमती लीना बनसोड यांचा देवमामलेदार यशवंतराव महाराज यांची परंपरा असलेली पगडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बनसोड यांनी बोलताना सांगितले की, गरीबाचा मुलगा शिकला पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत १५ व्या वित्त आयोगातून लोकप्रतिनिधींनी स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, आणि पाणीपुरवठाच्या कांमावर भर दिला तर भविष्यात येणारे संकटे टाळता येतील. यासाठी अधिकाऱ्यांनाही प्रामाणिकपणे काम करण्याची अपेक्षा श्रीमती बनसोड यांनी व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती कान्हु अहिरे ,जिल्हा परिषद सदस्य लताताई बच्छाव, मीना मोरे, पंचायत समिती सदस्य संजय जोपळे, शितल कोर ,भाजपा तालुका उपाध्यक्ष डॉ विलास बच्छाव काळु ढुमसे, सुरेश मोरे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे ,सहायक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी बांधकाम उपअभियंता अशोक शिंदे ,ल.पा.चे उपअभियंता चौधरी, पाणीपुरवठाचे उपअभियंता महाजन, विस्ताराधिकारी अधिकारी सूर्यवंशी, आदींसह शाखा अभियंता एस. डी. शिवदे ,सतीश कापडणीस उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब बच्छाव यांनी केले
पंचायत समितीच्या जागेचा प्रश्न मार्गी लावणार
पंचायत समितीच्या नवीन इमारती साठी जागा नावावर होण्याच्या अडचणी संदर्भात आपण स्वता लक्ष घालुन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे प्रत्यक्षात पाठपुरावा करणार असल्याचे श्रीमती लिना बनसोड यांनी उपसभापती कान्हू आहिरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पंचायत समितीच्या नवीन इमारती साठी जागा नावावर होण्याच्या अडचणी संदर्भात आपण स्वता लक्ष घालुन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे प्रत्यक्षात पाठपुरावा करणार असल्याचे श्रीमती लिना बनसोड यांनी उपसभापती कान्हू आहिरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.