नवी दिल्ली – पाकिस्तानी अग्निबाण आणि बॉम्ब गोळे यांच्या वर्षावामुळे किर्नी सेक्टरमधील बंद असलेली शाळा आता खुल्या जागेवर विद्यार्थ्यांचे वर्ग घेत आहे. नियंत्रण रेषेचे शेवटचे गाव कीर्नी असून या ठिकाणी शाळेसमोर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आहेत. आता या बाजूला शिक्षक फळ्यावर मुलांना निर्भिडपणे शिकवत आहेत. कारण भारत आणि पाकिस्तान लष्कर यांच्यात झालेल्या युद्धबंदी कराराने अचानक वातावरण पूर्णपणे बदलले आहे.










