मुंबई – इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाली असली तरी सद्यस्थितीत प्रचंड संभ्रम आहे. तसेच, स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याची मुभा दिल्याने त्या त्या प्रशासनाकडून निर्णय घेतला जात आहे.
राज्यभरातील सद्यस्थिती अशी
नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (२२ नोव्हेंबर) बैठक होईल. त्यात निर्णय घेतला जाईल.
पिंपरी चिंचवड – महापालिका हद्दीतील शाळा ३० नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय
पुणे – येत्या १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय
धुळे – सोमवारी (२३ नोव्हेंबर) बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार
औरंगाबाद – महापालिका क्षेत्रातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद राहणार