मुंबई – केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागानं संस्थाचालक महामंडळांची ऑनलाईन बैठक घेतली. यात सर्व संस्थाचालकांनी २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु करायला नकार दिला आहे कारण पालकदेखील या गोष्टींना तयार होणार नाहीत, असं सूचित केलं. त्यामुळे दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हे शक्य देखील नाही असंही गायकवाड यांनी सांगितलं. शाळा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारनं घालून दिलेल्या मार्गदर्शक कार्यप्रणालीनुसार शाळांचं निर्जंतुकीकरण करणं केवळ ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांाची उपस्थिती, मास्क वापरणं अनिवार्य करणं, सॅनिटायझरचा वापर या सर्व गोष्टींना वेळ लागेल त्यामुळे २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु करणं शक्य नसल्याचं त्या म्हणाल्या. या बैठकीत शिक्षण सचिव आणि अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.