मुंबई : लाॅकडाऊन कालावधीत शाळा बंद असताना देखील अनेक खासगी शाळांनी फी आकारणी केली होती. या शाळांना फी घेण्यास परवानगी देवू नये अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्रसह आठ राज्यातील पालक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती महाराष्ट्र पॅरेंन्टस अॅक्शन कमिटीचे उदय सोनोने यांनी दिली आहे.
सदर याचिकेत राज्य सरकारांनी खासगी शाळांकरीता फी नियामक मंडळ स्थापन करावे, फी न भरल्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांला शिक्षणापासून वंचित ठेवू नये, तसेच शाळांच्या आॅनलाईन क्लासेसवर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही याचिका उत्तराखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, गुजरात,ओरिसा, महाराष्ट्र इ. राज्यातील पालक संघटनांनी एकत्रित येवून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पालकांनी शाळेची फी भरु नये, याकरिता पॅरेंन्टस अॅक्शन कमिटी, महाराष्ट्र या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
फी न भरल्यामुळे शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास या अॅक्शन कमिटीला संपर्क करावा. असे आवाहन
उदय सोनोने ( 9860011677. ई-मेल – paaindiaorg@gmail.com ) यांनी केले आहे.