धुळे – कोरोनाशी मुकाबला संपलेला नाही तरीही लोक विनामास्क फिरताना दिसतात. त्यावर उपाय म्हणून धुळे महानगरपालिकेने शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कालपासून धुळ्यातील सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी कोरना रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्यात आली आहे.
धुळेशहरात आग्रा रोड शहर पोलिस चौकी, गांधी पुतळा, दत्त मंदिर चौक, देवपूर, बारापत्थरचौक, संतोषी माता मंदिराजवळील शिवतीर्थ चौक या पाच ठिकाणी महापालिकेने कोरोना चाचणी केंद्र सुरू केली आहेत. कोरोना नियंत्रणात ठेवण्यात आपण यश मिळवले असले तरीही दक्षता घेणे गरजेचे असल्याचे पालिका आयुक्त अजिज शेख यांनी म्हटले आहे. दिवाळीनिमित्त होणारी गर्दी आणि नागरिकांचा विनामास्क वावर यामुळे दंडात्मक कारवाई बरोबर रॅपिड टेस्ट करणारे ५ केंद्रे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.