मुंबई – टुथपेस्टच्या किंमती वाढल्या किंवा कमी झाल्या, टुथपेस्टमध्ये नव्या काही कंपन्या आल्या आहेत किंवा नाही याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना आता फारसा रस राहिलेला नाही. कारण आता व्हॉट्सअॅप हेच प्रत्येकाच्या दैनंदिन जगण्याचे साधन झाले आहे. यात कितीही नवे फिचर्स आले तरीही कमीच आहेत. पण एका नवे शानदार फिचर व्हॉटसअॅने आणले आहे. ताची माहिती आपण करुन घेणार आहोत.
हे ओळखता येणार
व्हॉट्सअॅप सुरू न करता आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोण कोण आनलाईन आहेत, हे ओळखता येणार आहे, असे कुणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण ते आता शक्य झाले आहे. त्यासाठी GBWhatsApp या थर्ड पार्टी एपची मदत घ्यावी लागणार आहे. सुरुवातीला गुगलवर जाऊन GBWhatsApp हे एप सर्च करायचे. त्या लिंकवर जाऊन पहिले एपीके फाईल डाऊनलोड करा. त्यानंतर GBWhatsApp हे एप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. पण थर्ड पार्टी एप असल्यामुळे ते प्रत्येकाला आपल्या रिस्कवरच करावे लागणार आहे. या एपच्या सेटींगमध्ये जाऊन Main/Chat screen च्या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर Contact Online Toast मध्ये जायचे. त्यानंतर ज्याचे आनलाईन स्टेटस चेक करायचे आहे त्या कॉन्टॅक्टमध्ये जायचे. एवढेच नव्हे तर तुम्ही निवडलेला कॉन्टॅक्ट जेव्हाही आनलाईन येईल, त्याचे नोटीफिकेशन तुमच्या मोबाईलवर आलेले असेल.
व्हॉट्सअपवर नवे फिचर
आतापर्यंत म्यूट करण्यासाठी ८ तास, १ आठवडा आणि १ वर्ष असे ऑप्शन व्हॉट्सअपवर मिळायचे. मात्र आता कंपनीने १ वर्षाएवजी अलवेज म्यूट (नेहमी) असे फिचर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता कोणत्याही ग्रुपला किंवा व्यक्तीला तुम्ही नेहमीसाठी म्यूट करू शकणार आहात.