नवी दिल्ली – जगातील शांततेसाठी दिला जाणारा सर्वोच्च नोबेल नन्मान जागतिक अन्न कार्यक्रमाला (वर्ल्ड फूड प्रोग्राम) जाहीर करण्यात आला आहे. नोबेल समितीने याची घोषणा केली आहे. उपासमारीचे उच्चाटन करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्यावतीने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे गरिब आणि अविकसित देशांमध्ये खासकरुन हा कार्यक्रम राबविला जात आहे. दोन वेळचे पोटभर जेवण सर्वांना मिळावे, या उद्देशातून हा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमामुळे युद्ध जन्य परिस्थिती टाळण्यात मदत होत आहे. यामुळेच जगात शांतता नांदणार असल्याचे समितीने म्हटले आहे.