सेऊल – उत्तर कोरियाचे नेते आणि शहेनशहा किम जोंग उन यांनी पक्षाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याने ते आणखी चर्चेत आले आहेत. या बैठकीत किम जोंग-उन यांनी आपलाच दर्जा उंचावत स्वत:ची सरचिटणीसपदी निवड केली आहे. तर त्यांची बहीण किम यो-जंग हिला उत्तर कोरियाच्या प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या अंतर्गत समितीतून बाहेर काढले आहे. भविष्यात बहिणीपासूनच आपल्या वर्चस्वाला धोका असल्याने किम जोंग घाबरले असून त्यातूनच हा निर्णय घेतल्याची जगभरात चर्चा आहे.
पक्षाच्या बैठकीच्या सहाव्या दिवशी त्यांनी स्वत: ची पदोन्नती करून सरचिटणीसपदी निवड केली. यापूर्वी, जोंग यांचे दिवंगत वडील आणि आजोबा यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र यानंतर किम जोंगने आपल्या बहिणीची राजकीय दर्जा कमी का केला याची चर्चा सुरू आहे. या मागे, नातेवाईकांपैकी कोणत्याही व्यक्तीस दुसर्या स्थानावर सत्तेत स्थान मिळू देऊ नये, अशी किम जोंगला भीती वाटत आहे.
किम जोंग गेल्या वर्षी पोलिटब्युरोचे पर्यायी सदस्य झाले. यावेळी लेबर पक्षाच्या बैठकीत त्यांना ब्युरोचे पूर्ण सदस्यत्व मिळेल, अशी अपेक्षा होती. पॉलिटब्युरो ही उत्तर कोरियामधील एक शक्तिशाली राजकीय संस्था असून देशातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची प्रमुख संस्था आहे. सरकारच्या कारभारामध्ये त्याचे सदस्य महत्वाची भूमिका बजावतात. ब्युरोच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. त्यामुळे या निर्णयामागे किम जोंग यांना देशाच्या राजकारणापासून दूर ठेवले जात आहे, असा निषेध व्यक्त केला जात आहे. किम जोंग उनच्या या हालचालीमुळे त्यांच्या बहिणीला राजकारण सोडण्यास भाग पाडले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. अध्यक्ष आणि हुकूमशहा किम जोंग उन यांच्या कुटूंबातील राजकारणात तिसरी पिढी आहे.