नाशिक – शहर पोलीस दलातील ११ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमात हे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत.
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर घाडगे, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल भालेराव, देवळाली कॅम्पचे सहायक पोलीस उपनिरीक्षक भागिरथ हांडोरे, मुख्यालयातील राजेंद्र ठाकरे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विष्णु उगले, म्हसरुळचे पोलीस हवालदार सुरेश माळोदे, सरकारवाडाचे पोलीस हवालदार प्रभाकर कोल्हे, वाहतूक शाखेचे पोलीस नाइक देवराम सुरुंगे व म्हसरुळचे पोलीस नाइक भारत पाटील यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.