नाशिक – शहर परिसरात पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गौळाणे गावासह सातपूर, अंबड आदी ठिकाणी बैलांचे औक्षण करुन त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. शेतकऱ्यांनीही बैलांना सजविले होते. कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या या सणात विविध कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. गौळाणे गावात विश्वास चुंभळे, विनोद चुंभळे, शांताराम घेळ, भरत घेळ आदींच्या उपस्थितीत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. तर, घराघरात बैलाच्या प्रतिमा आणि मूर्तींचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.