अपघातात एकाचा मृत्यू
नाशिक – त्र्यंबकहून नाशिकरोडकडे जात असताना एक्सलो पॉइंट परिसरात अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. देवेंद्र मधुकर निकम (रा. द्वारका) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ८) सकाळी पावनेनऊच्या सुमारास निकम हे एक्सलो पॉइंट येथून नाशिकरोडकडे जात होते. यावेळी अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाºयांनी निकम यांची तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मात मृ त्यूची नोंद करण्यात आली आहे.
—
एसटीच्या धडकेत महिला जखमी
नाशिक – भरधाव जाणाºया एसटी बसने मोटारसायकलला कट मारल्याने महिला जखमी झाली असून मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मदनदास रतनदास बैरागी (रा. काठेगल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक संशयित मंगेश देवीदास पालखे (औरंगाबाद बस डेपो) यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी मदनदास बैरागी हे प त्नीसह मोटारसायकल क्र. (एमएच १५ इएन ९३८९) वरून जात टॅक्टर हाऊस, सर्विस रोडने जात होते. यावेळी भरधाव वेगाने आलेली बस क्र. (एमएच २० बीएल ३८९९) ने बैरागी यांच्या मोटारसायकलला कट मारला. त्यामुळे बैरागी यांची पत्नी पुष्पा यांच्या डाव्या पायास गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस उपनिरिक्षक भालेराव तपास करत आहे.
—
टेम्पोची मोटारसायकलला धडक
नाशिक – भरधाव टेम्पोने मोटारसायकलला धडक देवून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रवीण शरद ढेपले (रा. जत्रा हॉटेल समोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित घुरे घनशाम सिंग (रा. मथूरा, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. ८) रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी प्रवीण ढेपले हे मोटारसायकल क्र. (एमएच १५ एफसी १७५७) वरून मुंबई-आग्रा मार्गाने के. के. वाघ कॉलेज समोरून जात होते. यावेळी पाठिमागून आलेले टेम्पो क्र. (युपी ८५ बीटी ७०७९) ने मोटारसायकलला धडक देवून नुकसान केले. याप्रकरणी पोलीस नाईक एच. पी. सोनवणे तपास करत आहे.
—