मुंबई – सेलिब्रेटींच्या ड्रग्ज सेवन प्रकरणी मोठा गौप्यस्फोट अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने गुरुवारी केला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) समोर उपस्थित झालेल्या शर्लिनने सांगितले की, आयपीएल स्पर्धेवेळी क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्ज सेवन केले आहे. एकदा कोलकात्यात सामना पाहण्यासाठी गेले असता वॉशरुममध्ये क्रिकेटपटू व बॉलिवूड स्टार्सच्या पत्नीही कोकेनचे सेवन करीत होत्या. त्यानंतर मी तेथून निघून गेले, असे तिने एनसीबीला सांगितले. तिच्या या दाव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता क्रिकेटपटूंच्या पत्नींकडेही या प्रकरणाचा रोख गेला आहे. शर्लिनबरोबरच फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा हिची सुद्धा एनसीबीने चार तास चौकशी केली. श्रुती मोदीचीही एनसीबीने चौकशी केली.
दरम्यान, ड्रग्ज सेवन प्रकरणी दिग्दर्शक करण जोहर यांचे धर्मा प्रॉडक्शन सुद्धा एनसीबीच्या रडारवर आले आहे. प्रॉडक्शनचे क्षितिज रविप्रसाद यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ते आज एनसीबी समोर हजर राहणार आहेत. तर, दीपिका पदुकोण शनिवारी चौकशीसाठी येणार आहे.