नवी दिल्ली – मधुमेह हा एक असाध्य रोग असून एकदा आपल्या शरीरात आला की, आयुष्यभर राहतो. रक्तातील साखर वाढल्यास या आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण काम आहे.
तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेची पातळी जास्त राहिल्यास आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. मूत्रपिंड, यकृत, मेंदू यासह शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण अवयवांना याचा त्रास होतो.
मधुमेहाचे मुख्य कारण अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, अशी अनेक लक्षणे आहेत जी मधुमेहाचे सूचक आहेत. मधुमेहाचे सूचक लक्षणे दिसताच परिस्थितीत अजिबात निष्काळजीपणाने वागू नका आणि तत्काळ जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
या लक्षणांबद्दल काही माहिती जाणून घेऊ या…
वारंवार मूत्रविसर्जन
शरीतात रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, मूत्रपिंड रक्त शुध्दीकरणाचे कार्य थांबवते. यामुळे मूत्रात साखरेची पातळी वाढते. यामुळे पीडित व्यक्तीला वारंवार लघवीला जावे लागते. याव्यतिरिक्त, जंतु संसर्गामुळे देखील आजार वाढू शकते. अशा परिस्थितीत, कृपया डॉक्टरांशी संपर्क साधावा.








