मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पवार हे त्यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे आले आहेत. आगामी सात दिवस त्यांना विश्रांती घेण्याचे आणि आगामी १५ दिवसांनी पुन्हा चेकअपसाठी डॉक्टरांनी बोलवले आहे. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे. १५ दिवसानंतर त्यांची प्रकृती उत्तम राहिली तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रीया केली जाणार आहे. पोट दुखत असल्याने गेल्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1378227654378184704
https://twitter.com/NCPspeaks/status/1378240888673984513