मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पोट दुखत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. येत्या ३१ मार्च पर्यंत ते हॉस्पिलमध्ये राहणार आहेत. त्यांच्यावर एन्डोस्कोपी आणि सर्जरी केली जाणार आहे. त्यांचे आगामी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रक्त पातळ करणारी त्यांची औषधेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे थांबविण्यात आली आहेत.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1376401688471343105