कोरोना योद्धा आशा सेविकांचा राष्ट्रवादी युवकने साडी देऊन केला सन्मान
नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक शहरात निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा व कोरोना योद्धा आशा सेविकांचा सन्मान सोहळा राष्ट्रवादी भवन येथे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास सोनवणे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अभिष्टचिंतन एका राजसु व्यक्तिमत्वाचे ! या शीर्षकाखाली ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. ही ऑनलाईन स्पर्धा सर्व वयोगटातील व्यक्तींकरिता आयोजित करण्यात आल्याने स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आदरणीय शरदचंद्रजी पवार ……एक स्व विचारधारा! व राजकिय योध्दा…….नाबाद ८०! असा निबंध स्पर्धेचा विषय होता. तर शरदचंद्रजी पवार यांचे प्रतिमाचित्र व शरदचंद्रजी पवार यांच्या जिवनावरील क्षण चित्र हे चित्रकला स्पर्धेचे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षक सुनंदाताई वडनेरे हे होते. निबंध स्पर्धेत वैशाली बागुल यांना प्रथम, प्रज्वल सूर्यवंशी यास द्वितीय, जयश्री गुंजाळ यांना तृतीय क्रमांक तर रिषु पांडे, हेमलता भामरे, आरोही बिरारी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट चित्रकला स्पर्धेत अर्जुन वडघुले व जोत्स्ना शिंदे- पाटील यांना संयुक्तिक प्रथम, ऋतुजा जेजुरकर यांना द्वितीय समीर धिवरे यांना तृतीय तर धनश्री जाधव, आराध्या मुसळे, श्रुती राठी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
वैश्विक महामारी कोरोना विषाणूच्या आजारामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. परंतु या संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आशा सेविकांनी आपले कर्तव्य अविरतपणे बजावले. अशा कोरोना योद्धांचा सन्मान साडी, पुष्प व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्याचा उचित गौरव व्हावा याकरिता या उद्देशाने पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
यावेळी बाळा निगळ, निलेश भंदुरे, विकास सोनवणे, शिवराज ओबेरॉय, जय कोतवाल, मुकेश शेवाळे, अंकुश वराडे, नवराज रामराजे, सागर बेदरकर, संतोष जगताप, सम्राट गायकवाड, राहुल कमानकर, अक्षय पाटील, करण आरोटे, भावना देवरे, वैशाली कुमावत सुरेखा देवरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व पालकवर्ग उपस्थित होते.