मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर रात्री उशीरा शस्त्रक्रीया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. येत्या काही दिवसात दुसरी शस्त्रक्रीया केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पोटात दुखू लागल्याने पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रीयेद्वारे पित्ताशयातील खडा बाहेर काढण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे खडे झाल्याने त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. आज एन्डोस्कोपी या शस्त्रक्रीयेद्वारे मोठा खडा काढण्यात आला. मात्र, आणखी काही थोटे खडे असल्याने आता गॉल ब्लॅडरच काढावे लागणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आजच्या शस्त्रक्रीयेमुळे पोट दुखीपासून पवार यांना आराम मिळणार आहे. दरम्यान, गॉल ब्लॅडर काढल्यानंतर पवार यांना काहीही नुकसान होणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
पवार यांचे पोट दुखत होते. डॉक्टरांनी त्याचे निदान केले. त्यात असे दिसून आले की पोटात पित्ताशयाच्या तोंडाशी एक मोठा खडा अडकून पडला होता. त्यामुळे पवार यांना त्रास होत होता. एन्डोस्कोपीद्वारे हा खडा आता काढून टाकण्यात आला आहे. गॉल ब्लॅडर कधी काढायचे याचा निर्णय डॉक्टर लवकरच घेणार आहेत. पवार यांना बरे वाटल्यानंतर घरी सोडले जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021