जो बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर देशातील कोरोना संकट, आर्थिक पेचप्रसंगाचे संकट, पर्यावरणीय समस्या आणि वांशिक असमानता या चार आव्हानांवर मात करण्यासाठी सुमारे एक डझन प्रस्तावावर स्वाक्षरी करणार आहेत.
स्थलांतरितांनाही नागरिकत्व घोषित:
आपल्या कार्यकाळच्या पहिल्या दिवशी ते 1.1 दशलक्ष स्थलांतरितांनाही नागरिकत्व घोषित करू शकतात. व्हाईट हाऊसचे नवनियुक्त चीफ ऑफ स्टाफ, रॉन क्लेन म्हणाले की, नवनिर्वाचित अध्यक्ष बायडेन जेव्हा पदभार घेत आहेत, तेव्हा देशाला गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या चार मोठी संकटे आहेत, जी एकमेकांशी संबंधित आहेत.
कोरोना हेच मोठे संकट :
कोरोना आणि यामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे पर्यावरणाशी संबंधित समस्या आणि वांशिक समानतेच्या कमतरतेशी संबंधित संकट आहेत. या सर्व संकटांवर उपाय म्हणून तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे, आणि बायडेन आपल्या कार्यकाळातील पहिल्या 10 दिवसांत या संकटांना सामोरे जाण्यासाठी निर्णायक पावले उचलतील. शपथविधीच्या दिवशी नवनिर्वाचित अध्यक्ष बायडेन हे चार मोठया संकटाचा सामना करण्यासाठी डझनभर प्रस्तावांवर स्वाक्षरी करतील.
कोरोनावर मदत पॅकेज :
बायडेन पहिल्याच दिवशी अमेरिकन लोकांना कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराशी संबंधित मदत पॅकेजेस देखील घोषीत करतील. आधीच जाहीर केल्याप्रमाणे, शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या वसूलीची स्थगिती वाढवतील, पॅरिस करारामध्ये पुन्हा सामील होतील .
हजारो सैनिक वॉशिंग्टनला दाखल :
वॉशिंग्टनमधील हिंसक निषेधांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण अधिकाऱ्यांनी अधिकाधिक सैन्यांची मागणी केल्यानंतर अनेक प्रांतातील बस आणि विमानाने मोठ्या संख्येने सैनिक राजधानीत दाखल होऊ लागले. पुढील आठवड्याच्या सुरूवातीला 25,000 हून अधिक सैन्य वॉशिंग्टनमध्ये येण्याचा अंदाज आहे. अनेक हजार सैनिक बस आणि सैन्याच्या ट्रकमध्ये चढून वॉशिंग्टनमध्ये येत आहेत.
कमला हॅरिस यांना शपथ :
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोनिया सोटोमायोर बुधवारी शपथविधी सोहळ्यात नवनिर्वाचित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना शपथ देतील. दक्षिण अशियाई महिला उपराष्ट्रपती म्हणून पदभार घेतील. तर श्योमायोर हे पहिले लॅटिन अमेरिकन न्यायमूर्ती आहेत ज्यांनी शपथ घेतली. एका सूत्रानुसार, सोटोमायॉर यांची निवड हॅरिसने केली आहे.
शपथ घेण्यासाठी दोन बायबल :
शपथविधीमध्ये दोन बायबल देखील वापरली जातील, त्यातील एक म्हणजे सुप्रीम कोर्टाचा पहिला न्याय, हॅरिसच्या शपथविधीबद्दलची ताजी माहिती दिली. हॅरिस ह्या सोटोमायॉर आणि मार्शल या दोघांच्या चाहत्या आहे. त्या म्हणाल्या की, वकील बनण्याच्या इच्छेमागील मुख्य कारण म्हणजे मार्शल होय.