नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप कंपनीच्या प्रायव्हसी धोरणावरून झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता व्हॉट्सअॅपने जाहीर केले की, लोकांमधील चुकीची माहिती पोहोचल्यामुळे प्रायव्हसी अपडेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच, तूर्त प्रायव्हसी पॉलिसी पासून चार हात लांब राहण्याचे निश्चित केले आहे.
व्हॉट्सअॅपने म्हटले होते की, नवीन धोरण केवळ व्यवसायिक खात्यांसाठी आहे. वापरकर्त्यांच्या चॅट पूर्वीप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे पूर्णपणे सुरक्षित आहेत. व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपवर कमर्शियल एक्सचेंजची सुविधा देऊन महसूल जमा करण्याच्या योजनेला विलंब हा मोठा धक्का आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, 8 फेब्रुवारी रोजी कोणालाही त्यांचे खाते निलंबित करावे किंवा हटवावे लागणार नाही. आम्ही व्हॉट्सअॅपवर गोपनीयता आणि सुरक्षितता कशी कार्य करते, याबद्दल चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी आम्ही कार्यवाही करणार आहोत.
तर दुसरीकडे व्हॉट्सअॅपवरील नवीन प्रायव्हसी पॉलिसी घोषित झाल्यानंतर सिग्नल अॅप मोठ्या प्रमाणात डाउनलोड केले जात आहे. व्हॉट्सअॅपवर मात करुन सिग्नल अॅप भारतातील अव्वल विनामूल्य अॅप बनले आहे. भारताव्यतिरिक्त, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग आणि स्वित्झर्लंडमधील व्हॉट्सअॅपने त्यास मागे टाकले आहे. त्याच वेळी, जर्मनी आणि हंगेरीमधील सिग्नल देखील Google प्ले स्टोअरमधील टॉप फ्री अॅपमध्ये आपले स्थान मिळविण्यात यशस्वी झाला आहे.
नवीन गोपनीयता धोरणात करण्यात आलेल्या बदलांबाबत व्हॉट्सअॅप काही काळापासून चर्चेत आहे. नवीन धोरणात असे म्हटले आहे की, वापरकर्त्यांना त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा वैयक्तिक डेटा फेसबुकबरोबर शेअर करावा लागेल, जर वापरकर्त्यांनी व्हॉट्सचे हे गोपनीयता धोरण स्वीकारले नाही तर त्यांचे खाते आपोआप बंद होईल. त्यानंतर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विट केले की, आपण व्हॉट्सअॅपवर नव्हे तर सिग्नल अॅप वापरतो. त्यानंतर लोक सतत सिग्नल अॅप डाउनलोड करत आहे.