नवी दिल्ली – इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअॅपने ग्राहकांना चॅटिंगचा उत्तम अनुभव देण्यासाठी नवीन फीचर्स आणले आहे. यात डार्क मोडपासून निरनिराळ्या सुविधा देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, कंपनी सध्या बऱ्याच वैशिष्ट्यांवर काम करत आहे, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
Read Later फीचर
व्हॉट्सअॅप लवकरच सर्वात खास आणि जुने फीचर असलेल्या आर्काइव्ह चॅटचे नाव बदलून रीड लेटर ठेवणार आहे. हे खास करून व्हॅकेशन मोड म्हणून काम करणार आहे. हे फिचर सक्रिय झाल्यानंतर, वापरकर्त्यांना निवडक संदेश किंवा कॉल बाबत सूचना मिळणार नाहीत. तसेच ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे हे फिचर ऍक्टिव्हेट आणि डिऍक्टिव्हेट करता येणार आहे.
Mute videos फीचर
म्यूट व्हिडीओ हे नवे फिचर लवकरच समाविष्ट केले जाणार आहे. याद्वारे कोणताही व्हिडीओ पाठवण्याच्या आधी तो म्यूट करता येणार आहे. सध्या यावर काम सुरु असून त्याचे टेस्टिंग अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच हे नवे फिचर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Multi Device
हे फिचर फार युनिक असून, त्याद्वारे चार डिव्हाईसवर एकाच वेळी व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे, हे फिचर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.