नवी दिल्ली – ‘व्हॉट्सअॅप पे’ हे फीचर नुकतेच इन्स्टंट मेसेजिंग अँप्लिकेशनने लाँच केले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या सहकार्याने व्हॉट्सअॅप पेमेंटची रचना केली गेली आहे. हे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वर आधारित आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप अपडेट करणे अनिवार्य आहे. तसेच, बँकेशी लिंक असलेल्या नंबरच्या मदतीने मोबाइल नंबरवरून व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.
अशी आहे प्रक्रिया
व्हॉट्सअॅप उघडल्यावर सेटींग ऑप्शन निवडल्यावर पेमेंटचा पर्याय दिसेल. यानंतर अॅड पेमेंट पर्यायावर क्लिक करा. यानंतर बँक पर्याय निवडावा लागेल. बँक निवडल्यानंतर मोबाईल नंबर पडताळून घ्यावा लागेल. यासाठी एसएमएस पडताळणीचा पर्याय निवडू शकता. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक तपशील देय म्हणून जोडली जाईल.
कसे भरावे
व्हॉट्सअॅप पेमेंटची नोंदणी केल्यानंतर एकमेकांना पेमेंट करण्यास काहीही अडचण नाही. यासाठी व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट वर जाऊन पैसे पाठवता येणार आहे.
व्हॉट्सअॅप चॅट उघडावे, यानंतर पेमेन्टच्या चिन्हावर क्लिक करावे. यानंतर एंटर ऑप्शनवर क्लिक करून यूपीआय पिनवर क्लिक करावे.