शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

व्हेरीकोस व्हेन्स कशामुळे होतात?

by Gautam Sancheti
जानेवारी 4, 2021 | 4:42 pm
in इतर
0
Untitled

व्हेरीकोस व्हेन्स कशामुळे होतात?

आपल्या  हृदयाकडून इतर भागांकडे शुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या वाहिन्यांना धमणी म्हणतात. शरीराच्या इतर भागातून अशुद्ध रक्त हृदयाकडे शुद्धीकरणासाठी घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना Vein (नीला) असे संबोधले जाते. हातामध्ये आणि पायामधे व्हेन्सच्या दोन रचना असतात. Superficial Venous System म्हणजे ज्या नीला आपल्याला त्वचेखाली दिसतात त्या, आणि Deep Venous System म्हणजे मोठ्या धमनीच्या बाजूने जाणाऱ्या नीला. या दोन्ही रचना एकत्रित रित्या अशुद्ध रक्त (पायाकडून हृदयाकडे शुद्धीकरणासाठी) वाहून नेतात, ठिकठिकाणी त्या एकमेकांशी विशिष्ठ पद्धतीच्या झडपांद्वारे (Venous Valves) जोडल्या गेलेल्या असतात. या झडपा अशा पद्धतीने काम करतात की Superficial कडून Deep Venous System कडेच फक्त रक्ताचा प्रवाह जातो, साधारणतः उलट्या दिशेने हा प्रवाह कधीच जात नाही.

डॉ. किरण नेरकर
डॉ. किरण नेरकर
प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ

जांघेच्या भागांमध्येही अश्या प्रकारची एक जोडणी असते ज्यामध्ये Superficial Venous System एकत्रित होऊन एक मोठी नीला (Great Saphenous Vein) तयार होते आणि ती Deep Venous System ला एका झडपेद्वारे जोडली गेलेली असते (याला Saphenofemoral Junction असे संबोधले जाते). इथेही वर नमूद केल्या प्रमाणे एकदिशीय (Unidirectional) प्रवाह असतो. अशाच पद्धतीची अजून एक जोडणी गुडघ्याच्या पाठीमागच्या भागात असते (याला Saphenopopliteal Junction असे संबोधले जाते).

कुठल्याही कारणांमुळे वर नमूद केल्याप्रमाणे एकदिशीय (Unidirectional) प्रवाह जर उलट्या दिशेने वाहू लागला, तर त्याचे रूपांतर व्हेरीकोस व्हेन्स मध्ये होते.

VIDEO LINK:

QUICK FACTS:

१. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पाश्चात्य देशांमध्ये १० – २० % लोकांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स ची समस्या आढळून येते. परंतु भारतामध्ये कमी प्रमाणात.

२. म्हणजे ५ % लोकांमध्ये हे आढळून येते. त्यामध्येही उत्तर भारतीय लोकांपेक्षा अंदाजे ४ पॅट जास्त प्रमाण दक्षिण भारतीय लोकांमध्ये आढळून येते.

३. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.

४. जास्त वेळ उभे राहण्याबरोबरच जास्त वेळ बसून राहणेही तितकेच ह्या गोष्टीसाठी कारणीभूत आणि तितकेच घातक पण आहे.

५. व्हेरिकोज व्हेन्सची समस्या असणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदय रोगाचे जास्त प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आणि वजन आटोक्यात ठेवले तर ह्या समस्या टळतील.

६. व्हेरिकोज व्हेन्सचा उपचार हा सगळ्या वैद्यकीय विम्याच्या अंतर्गत केला जाऊ शकतो.

कुठल्या व्यक्तींमध्ये होतात व्हेरीकोस व्हेन्स?

१. दीर्घकाळ उभे राहण्याचा व्यवसाय असलेल्या व्यक्ती (जसे कंडक्टर, शिक्षक, मजूर),

२. गर्भवती महिला,

३. स्थूल प्रकृती असणाऱ्या व्यक्ती

४. अनुवंशिकता,

५. वयोमानानुसार झडप निकामी होणे किंवा निलांची भिंत पातळ होणे

या व्यक्तींमध्ये पायाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या  (नीला / Vein) वाहिन्यांचा घेर विस्तृत होऊन (फुगून) त्या कालांतराने पिळवटु लागतात. याला “व्हेरीकोस व्हेन्स” असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमधील सतत उच्च रक्तदाब आणि निकामी झालेल्या झडपा यामुळे हा प्रकार होतो.

Dr Nerkar 2

याची काय लक्षणे असतात?

१. सुरुवातीच्या दिवसांत संध्याकाळच्या वेळेस पाय दुखणे,

२. घोट्याजवळचा भाग लाल / काळसर पडणे,

३. पायाला खाजव येणे , त्यातून पाणी येणे,

४. पोटरीच्या भागात गाठी जाणवणे ही लक्षणे दिसू लागतात.

५. योग्य वैद्यकीय सल्याच्या अभावी कालांतराने पायाच्या घोट्याच्या  भागात जखमा होऊन त्या काहीकेल्या सावळत नाहीत. फुगलेली रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव होण्याचीही दाट शक्यता असते.

अशी लक्षणे असल्यास, प्लास्टिक सर्जनना  दाखवून त्यांच्या सल्याने दोघे पायांच्या योग्य त्या तपासण्या ( पायांची सोनोग्राफी ) करून घ्याव्यात.

या समस्येवर काय उपचार पद्धती उपलब्ध आहेत?

लवकर ही समस्या लक्षात आली  तर :

  • विशिष्ठ प्रकारचे मोजे (Compression Stockings) वापरणे ,
  • पाय उशीवर वरती उचलून ठेवणे,
  • शक्य झाल्यास कामाचे स्वरूप बदलणे

या गोष्टी पाळल्यास बऱ्याच लोकांना आराम मिळतो. गरोदर महिलांमध्ये व्हेरीकोस व्हेन्स ची समस्या असल्यास आणि अश्या व्यक्ती ज्यांच्यामध्ये ऑपरेशन करता येणे शक्य नाही, त्यांनाही हाच सल्ला दिला जातो. पण उशिरा लक्ष्यात आल्यानंतर किंवा समस्या चिंताजनक असल्यास खराब असलेल्या व्हेन्सचा भाग काढून टाकणे हाच एक उपाय आहे . त्यासाठी ओपन सर्जरी (Multiple Perforator Ligation / Phlebectomy) हा खात्रीशीर उपाय ठरतो.  ह्या ऑपरेशन मध्ये  साधारणतः कमरेत भूल दिल्यानंतर सोनोग्राफी च्या साहाय्याने निर्देशित केलेल्या जागांवर छोट्या चिरा घेतल्या जातात, निकामी झालेल्या झडपांचा भाग डोळ्यादेखत काढून टाकून Superficial आणि deep  Venous Systems एकमेकांपासून वेगळ्या केल्या  जातात  जेणेकरून उच्च दाबाने  Superficial Venous System मध्ये रक्तप्रवाह येणे कायमचे बंद होते ; त्यानंतर टाके घातले जातात. रुग्णाला त्याच दिवशी घरी सोडले जाऊ शकते.  टाक्यांचे व्रण हे कालांतराने नाहीसे होतात. ऑपरेशन झाल्यानंतरही  Compression Stockings, रात्री पाय उशीवर ठेवून झोपणे , शक्य झाल्यास कामाचे स्वरूप बदलणे या गोष्टी पाळल्या तर हि समस्या परत उद्भवण्याची शक्यता कमी असते. लेझर द्वारे पण हे केले जाऊ शकते. परंतु त्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्स चा प्रश्न परत उद्भवण्याची संभावना ओपन सर्जरीपेक्षा खूप जास्त असते.

व्हेरीकोस अल्सरवर उपचार

व्हेरीकोस व्हेन्स ची समस्या दुर्लक्षित केल्यामुळे होणाऱ्या जखमांना व्हेरीकोस अल्सर म्हटले जाते. ते झाल्यानंतरही वर नमूद केल्या प्रमाणेच ऑपरेशन केल्यानंतर बहुतांशी जखमा ह्या २ ते ३ आठवड्याच्या कालावधीमध्ये सावळतात. तसे न झाल्यास त्या जखमांना प्लास्टिक सर्जरी द्वारे बरे केले जाऊ शकते.

पत्ता : आकार हॉस्पिटल (डॉ. किरण नेरकर), ४ था मजला, साई स्क्वेअर कॉम्प्लेक्स, तुपसाखरे लॉन्सच्या अलिकडे, मुंबई नाका, नाशिक

अपॉइंटमेंट साठी फोन : ९८९०८४४४०० (सोमवार ते शनिवार)

Dr Nerkar 1

Sponsored Feature

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नायगाव येथे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Next Post

वर्षभरात बदलले रियाचे आयुष्य; लवकरच मोठ्या पडद्यावर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Eqj6k2mU0AA2pwo

वर्षभरात बदलले रियाचे आयुष्य; लवकरच मोठ्या पडद्यावर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
Pharmacy

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ जणांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड; लाखोच्या पॅकेजवर भरती

ऑगस्ट 7, 2025
क्रीडा व युवक कल्याण विभाग आढावा बैठक 1 1 scaled 1

नव्या खात्याची नवी जबाबदारी….क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार घेताच दिले हे निर्देश

ऑगस्ट 7, 2025
Screenshot 20250807 190254 Facebook

केंद्रीय अर्थमंत्री व वाणिज्यमंत्री यांची नाशिकच्या तिन्ही खासदारांनी घेतली भेट…कांदा प्रश्नांकडे वेधले लक्ष

ऑगस्ट 7, 2025
RUPALI

खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ, १४९७ नग्न फोटो…रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती

ऑगस्ट 7, 2025
IMG 20250807 WA0307 2

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011