मुंबई – बिहारच्या नितीश सरकारमध्ये भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी उद्योग मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान नेते आहेत. हुसैन यांच्या राजकारणातील प्रवासाप्रमाणेच त्यांची लव्ह स्टोरी देखील इंटरेस्टींग आहे. फार कमी लोकांना हे माहिती आहे की भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे शाहनवाज हुसैन बॉलिवूडमध्ये जाता जाता राहून गेले होते.
व्हॅलेंटाईन विकमध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या प्रेम कहाण्यांची चर्चा सुरू असताना हुसैन यांची चर्चा होऊ नये तरच नवल. बिहारच्या सुपोल येथील विल्यम्स हायस्कूलमध्ये हुसैन बारावी शिकले. त्यानंतर १९८६मध्ये पुढील शिक्षणासाठी दिल्लीतील पुसा एग्रीकल्चर कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. यादरम्यान ते दररोज डीटीसीच्या बसने कॉलेजला जायते. या प्रवासात त्यांना एक सुंदर तरुणी दिसली आणि त्यांचा तिच्यावर जीव जडला. पहिल्याच नजरेत प्रेम झाल्यामुळे हुसैन यांनी तिला फॉलो करायला सुरुवात केली. एकदा तर बसमध्ये प्रचंड गर्दी असताना त्यांनी आपल्या जागेवर तिला बसवले. हळूहळू गप्पा रंगायला लागल्या आणि ओळख वाढू लागली.
धर्माचे टेंशन
शाहनवाज आणि या तरुणीत जवळीक वाढू लागली होती. मात्र तिचे नाव रेणू हे हे कळताच त्यांना धर्माचे टेंशन आले. प्रपोज करण्याच्या आड धर्म आला. पण शाहनवाज हरले नाहीत. रेणूच्या घरच्या मंडळींनाही शाहनवाज आवडायचे. पण तरीही आपल्या मनातील भावना ते तिच्याजवळ व्यक्त करू शकले नव्हते.
अखेर एक दिवस शाहनवाज यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त केले. पण धर्म वेगळे असल्याने रेणूने नकार दिला. तरीही दोघांमधील मैत्री कायम होती. त्यामुळेच कदाचित दोघांच्याही कुटुंबापर्यंत ही बाब गेली. शाहनवाज जवळपास नऊ वर्षे रेणूला समजवत राहिले. अखेर त्यांची मेहनत फळाल आली आणि १९९४ मध्ये दोघांनीही लग्न केले. आज शाहनवाज व रेणू यांना दोन मुले आहेत. एकाचे नाव अदीब आणि दुसऱ्याचे अरबाज आहे. त्यांच्या घरी ईद, होळी, दिवाळी सारेच सण साजरे होतात.
वाजपेयी म्हणाले होते बॉलिवूडमध्ये जाऊ नको
शाहनवाज यांच्या जीवनात आणखी एक टर्निंग पॉईंट होता. ते आज कदाचित अमिताभ, शाहरुख, सलमानप्रमाणे हीरो बनू शकले असते. त्यावेळी ते वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. काही बॉलिवूड निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून हीरोचा रोल आफर केला होता. त्याबाबत शाहनवाज अटलजींशी बोलले. त्यावर राजकारणीच चांगले वाटता, चित्रपटात जाण्याचा विचार सोडून द्या, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या इच्छेचाही त्याग केला.