नवी दिल्ली – व्हॅलेंटाइन हा प्रेमाचा दिवस. यादिवशी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही खास गिफ्ट घेतोच. पण आपणही त्यादिवशी खास दिसणे आवश्यक आहे. त्याच्या शॉपिंगसाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचा हा दिवस नक्कीच खास जाईल.
व्हॅलेंटाइनसाठी अमेझॉनने काही खास गोष्टी आणल्या आहेत. अमेझॉनच्या फॅशन अँड ब्युटी कलेक्शन अंतर्गत व्हॅलेंटाइन डे स्टोअर सुरू केले आहे. फॅशन आणि ब्युटीशी संबंधित सगळ्या स्टाईल्स तुम्हाला इथे मिळतील. यामुळे तुम्ही सुंदर तर दिसालच पण तुमच्या जोडीदाराची नजरही तुमच्यावरून हटणार नाही.
महिलांसाठी
प्रिंटेड क्रॉप टॉप्स
जर तुम्ही ब्रेकफास्ट किंवा लंच डेटला जाणार असाल तर घेरदार स्कर्ट किंवा पॅन्टसोबत असा प्रिंटेड क्रॉप टॉप छान दिसेल. एखादा हटके तरीही सुंदर टॉप निवडून तुम्ही या कॅज्युअल वेअरमध्येही सुंदर दिसाल.
स्लीक ऍनालॉग डायल वॉच
जेव्हा तुम्ही कॅज्युअल लूकसाठी तयारी करत असता तेव्हा स्लीक रिस्टवॉच ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी तुम्ही मेटॅलिक स्ट्रीप आणि ऍनालॉग डायलचे घड्याळ निवडा.
स्कीनकेअर कॉम्बो कीट
अत्यंत नैसर्गिक अशा या स्कीनकेअर कॉम्बो कीटच्या सहाय्याने तुम्ही व्हॅलेन्टाईन डे साठी तयार होऊ शकता. हे नैसर्गिक क्रीम लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर काही डाग, फोड असतील तर ते निघून जातील. आणि तुमची त्वचा नितळ दिसेल.
पेस्टल कलर्ड फेस मास्क
एवढी सगळी तयारी केल्यानंतर आपण उठून दिसावे यासाठी तशाच प्रकारचा मास्क निवडा. तुम्ही घराबाहेर पडल्यावर या मास्कमुळे तुमच्या लूकमध्ये भरच पडेल.
पुरुषांसाठी
आपल्या वेशभूषेला शोभून दिसेल अशा पद्धतीचे स्मार्ट वॉच घेऊन तुम्ही तुमचा लूक अधिकच आकर्षक करू शकता.
आपल्या चेहऱ्याला सूट होईल अशा पद्धतीचा गॉगल निवडा.
स्किनकेअर रिजीम किट
तुम्ही कपडे काय घातले आहेत, किंवा काय ऍक्सेसरीज आहेत याबरोबरच तुमची त्वचा कशी आहे, याकडेही तुमच्या प्रिय व्यक्तीचे लक्ष असणार आहे. त्यामुळे क्रीमची निवड आणि त्याचा योग्य वापर आवश्यक आहे.
ही सगळी तयारी केलीत की तुम्ही डेटसाठी तयार झालात म्हणूनच समजा. पण या सगळ्यांपेक्षा तुम्हाला जास्त सुंदर बनवेल ते तुमचे तुमच्या प्रिय व्यक्तीवरील प्रेम आणि त्या व्यक्तीसोबत वेळ घालवायला मिळणार असल्याने चेहऱ्यावर येणारा आनंद.