मुंबई – प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाइन डेची सगळ्यांवर जादू चढायला लागली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी तर यात आघाडीवर. सोशल मीडियावर त्यांचे हे प्रेमाचे सोहोळे सुरु झाले आहेत.
परफेक्शनिस्ट आमीर खान याची मुलगी इरा खान हिने आपला प्रियकर नुपूर शिखरे याच्यासोबतचे अनेक चांगले फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच ती त्याला धन्यवाद द्यायला विसरत नाही.
तू माझ्यासोबत असणं हे माझ्यासाठी सारंकाही आहे. इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर करताना इरा खान असं तर लिहितेच पण, विल यु बी माय व्हॅलेंटाइन? असंही त्याला विचारते.
इरा खानने शेअर केलेल्या या फोटोंवर आमिर खानसोबत काम केलेल्या फातिमा सना शेख यांनी चांगली कॉमेंट दिली आहे. आणखीही काहींनी त्यावर कॉमेंट्स दिल्या आहेत.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, नुपूर शिखरेचे वडील आमिर खानचे पर्सनल ट्रेनर आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे दोघे परस्परांना डेट करत आहेत. इरा खानचे २०१९ मध्ये मिशाल कृपलानीसोबत ब्रेकअप झालं आहे.