मुंबई – व्हॅलेंटाईन विक सुरू झाल्यापासून तरुणांमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट देण्याची मालिका सुरू होत असते. अश्यात कोणते गिफ्ट द्यावे, हा मोठा प्रश्न अनेकांपुढे असतो. मात्र आता त्याचा फार विचार करण्याची गरज नाही, कारण काही कुल गॅजेट्स उत्तम पर्याय म्हणून पुढे आले आहेत. यातील निवडक पाच गॅजेट्सची माहिती घेऊया…
Inbase Boom Plus Wireless Speaker
किंमतः १४९९ रुपये
हे कमी किंमतीत उपलब्ध होणारे एक उत्तम गिफ्ट ठरू शकते. यात ५०० एमएचची बॅटरी आहे आणि ती सिंगल चार्जींगमध्ये चार तास प्लेटाईम देते. तुम्ही हा स्पीकर कुठेही कधीही घेऊन जाऊ शकता. हे IPX6 सर्टिफाईड असून यात बिल्ट इन मायक्रोफोन देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने म्युझीक सुरू असताना कॉल आल्यास तो देखील रिसिव्ह करता येतो आणि गाणे देखील बंद होत नाही. कनेट्कीव्हीटीसाठी ब्ल्यूटूथ ५.० सपोर्ट देण्यात आला आहे.
Vingajoy Power Booster VB-005 Power Bank
किंमतः २९९९ रुपये
पॉवर बँकसारखे उत्तम गिफ्ट जगात दुसरे कुठलेच नाही. त्यामुळे एखाद्याला पॉवर बँक गिफ्ट म्हणून दिले तर त्याला आवडेल याची खात्रीच आहे. त्यासाठी Vingajoy ची Power Booster VB-005 पॉवर बँक बघू शकता. ही पॉवरबँक २० हजार एमएएचसोबत येते. या पॉवर बँकच्या मदतीने तुम्ही एकाचवेळी दोन डिव्हाईस चार्ज करू शकता. ही पॉवर बँक मोबाईलसह टॅबलेट, कॅमेरा, हेडफोन, अँड्रॉईड आणि टाईप सी डिव्हाईसलाही सपोर्ट करते.
Ubon Golf 2.0 Multimedia Speaker
किंमतः ७९९ रुपये
हा वजनाने हलका आणि कॉम्पॅक्ट डिढाईनचा स्पीकर आहे आणि तुमच्या टेबलवर जास्त जागाही घेत नाही. यात तुम्हाला पॉवरफूल आणि डायनॅमिक बेससह जबरदस्त साऊंड क्वालिटीही मिळते.
U&I Killer Wireless Naackband
किंमतः २९९९ रुपये
वायरलेस नेकबँड हल्ली तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. सध्या याचा ट्रेंड असून व्हॅलेंटाईन्स डे ला तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला हे नक्कीच गिफ्ट करू शकता. त्यासाठी U&I Killer Wireless Nackband एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्ही जॉगिंग आणि वर्कआऊटदरम्यानही याचा वापर करू शकता.
Acer Gateway True Wireless Earbuds
किंमतः ३४९९ रुपये
हे ईयरबड्स IPX4 वॉटर रेझिस्टंन्स आणि आकर्षक डिझाईनसह उपलब्ध आहे. यात टच कंट्रोल दिला आहे. त्याच्या मदतीने युझर्स म्युझिक, कॉल्स आणि व्हॉईस असिस्टंट एक्टीव्हेट करू शकतात. याला फूल्ल चार्ज होण्यासाठी दिड तास लागतो.