नवी दिल्ली – एखादा नंबर आपल्याकडे सेव्ह नसेल तर त्या व्हाट्सऍपवरून त्या नंबरवर मेसेज पाठवणे शक्य होत नाही, हे तुम्हाला माहित असेलच. पण ही गोष्ट आता शल्य आहे, असे आम्ही सांगितले तर. हो, आता असा मेसेज करता येणे शक्य आहे. यासाठी आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगणार आहोत.
यासाठी तुम्हाला मोबाइल किंवा डेस्कटॉपवर वेब ब्राऊजर ओपन करायचे आहे. त्यावर https://api.whatsapp. com/send?phone=XXXXXXXXXXX ही लिंक कॉपी पेस्ट करायची आहे. पण त्यापूर्वी फुल्यांच्या जागी ज्याला मेसेज पाठवायचा त्याचा नंबर आणि त्याचा कंट्री कोड टाकायला विसरू नका. एंटर केल्यावर message +९११२३४५६७८९० on whatsapp असे येईल. त्याखाली message असे येईल. त्यावर क्लिक केलेत की तुमच्याकडे व्हाट्सऍप नाही, असे दिसते अशा आशयाचा एक मेसेज येईल. त्याखाली डाऊनलोड किंवा व्हाट्सएप वेबचा पर्याय असेल. त्यामुळे तुम्ही व्हाट्सऍप डाउनलोड करू शकता किंवा व्हाट्सअप वेबचा देखील वापर करू शकता.