नवी दिल्ली – आपली प्रायव्हसी पॉलिसी बदलली असून ती न स्वीकारणाऱ्यांचे व्हाट्सअॅप अकाऊंट बंद होणार असल्याचा इशारा कंपनीने काही दिवसांपूर्वी दिला होता. ६ जानेवारीपासून याची नोटिफिकेशन यायला सुरुवातही झाली आहे. मात्र, व्हाट्सअॅपच्या या नवीन पॉलिसीची नेटकऱ्यांनी थट्टा करण्यास सुरूवात केली आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत युजर्सना आपण दिलेल्या माहितीचा कुठे आणि कसा वापर होतो, हे कळणार आहे. युजर्सना येणारे हे नोटिफिकेशन ८ फेब्रुवारीपर्यंत अॅक्सेप्ट (स्विकार) करायचे आहे. तोवर जर हे अॅक्सेप्ट केले नाही तर तुमचे व्हाट्सअॅप अकाऊंट नक्कीच डिलीट होईल.
या नवीन पॉलिसीत आहे काय?
व्हाट्सअॅप यापूर्वी देखील फेसबुक आणि थर्ड पार्टी ऍपला युजर्सची माहिती देतच होते. पण, या नवीन पॉलिसीनुसार कंपनी आता तुमची परवानगी घेऊन ही माहिती शेअर करेल. यामुळे कायद्याच्या कचाट्यातून कंपनीची सुटका होईल.
युजर्सनी केली थट्टा
व्हाट्सअॅपच्या या नवीन पॉलिसीची युजर्स नेटवर थट्टा करताना दिसत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, नवीन पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यास अकाऊंट डिलीट करायला लावणे म्हणजे कंपनी जबरदस्तीने आपल्या अटी मान्य करून घेत आहे. याव्यतिरिक्त या पॉलिसीत नवीन असे काही नाही.
User's privacy and data in #WhatsApp
be like : pic.twitter.com/jU3SIqzx3P— humour dead (@rehaandp) January 6, 2021