नवी दिल्ली – धुलीकणांमुळे आण्विक शस्त्रास्त्रांचा प्रभाव कमी करता येतो, हा प्रयोग, एका वर्षाच्या अवकाशानंतर विज्ञान विश्वात परतणाऱ्या एका महिला वैज्ञानिकांने लावला आहे.
अनेकदा विविध कारणे अथवा परिस्थितीमुळे आपल्या कुटुंबासाठी करीयर, व्यवसाय काही काळासाठी सोडणाऱ्या अनेक भारतीय महिला असतात. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची ‘महिला वैज्ञानिक अभ्यासवृत्ती योजना’,अशाच महिलांना अनेकविध संधी देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे, ज्यांना कारकीर्दीतील विरामानंतर पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होण्याची इच्छा आहे.
नवी दिल्लीतल्या, नेताजी सुभाष तंत्रज्ञान संस्थेतील डॉ मीरा चड्ढा यांनीही आपल्या करियरमध्ये घेतलेल्या विरामानंतर, मुख्य प्रवाहात येण्यासाठी या संधीचा उपयोग केला, एवढेच नाही, तर त्यांनी पहिल्यांदाच आपल्या गणितीय सूत्रांच्या अभ्यासातून हे सिध्द करुन दाखवले की आण्विक शस्त्रास्त्राचा मानवावर होणारा जीवघेणा परिणाम धुलीकणांच्या मदतीने अंशतः कमी करता येतो, किंवा दूरही करता येतो.
त्यांनी अलीकडेच केलेला याविषयीचा अध्ययन प्रबंध- ‘प्रोसिडिंग्ज ऑफ रॉयल सोसायटी, लंडन’ यात प्रसिद्ध झाला असून, या संशोधन प्रबंधात धूलीकणांच्या मदतीने, आण्विक स्फोटातून निघणाऱ्या किरणोत्सारी उर्जेचा परिणाम कसा कमी करता येईल, याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी या प्रबंधात हे दाखवून दिले आहे, की या स्फोटातून निघणाऱ्या लहरींचा प्रभाव कसा कमी करता येऊ शकतो.
आपल्या पीएचडी अभ्यासादरम्यान, मी शॉक वेव्ह म्हणजे विद्युत लहरींचा आणि त्यांची शक्ती कमी करण्यात धुलीकणांचा कसा वापर केला जाऊ शकतो, याचा अभ्यास केला होता. दरम्यान, मी आपले माझी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे ‘सायन्स टूवर्ड्स स्पिरीच्युएलिटी” हे पुस्तक वाचले. यात त्यांनी प्रश्न विचारला आहे की, “आपण विज्ञानाच्या मदतीने असा थंड बॉम्ब तयार करु शकतो का, जो जीवघेण्या अणुबॉम्बचा प्रभाव नष्ट करु शकेल?” या वाक्यानेच मी हे संशोधन करण्यास प्रेरित झाले, असे डॉ चड्ढा यांनी सांगितले.
त्यांनी आपल्या करियरमध्ये घेतलेल्या विरामाचा सदुपयोग करत, बॉम्बस्फोट आणि त्याचे धुलीकणांवर होणारे संभाव्य परिणाम यांचा अभ्यास सुरु केला. या योजनेमुळे त्यांना त्यांच्या संशोधनांच्या वेळेत शिथिलता देण्यात आली होती, शिवाय संशोधनासाठी लागणारी उपकरणे, साधने आणि निधी देखील देण्यात आला होता. या मदतीच्या भरवशावर त्यांनी आपले संशोधन करण्याचे स्वप्न पूर्ण केले.
[प्रबंध बघण्यासाठीची लिंक:
https://royalsocietypublishing.org/doi/10.1098/rspa.2020.0105