नाशिक – मेट इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेल्या उमेश लड्ढा यांनी डोळ्याच्या आजारावरील (ग्लुकोमा) संशोधन करून त्याचे पेटंट मिळवले आहे. डोळ्याच्या आजारावरील (ग्लुकोमा) वरील संशोधनाचा विषय त्यांनी पी. एच. डी. साठी घेऊन यशस्वीपणे संशोधन सुरु ठेवले. प्रा. लड्ढा यांनी सिंहगढ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये शिक्षण असतानाच २०१४ मध्ये त्यांनी ग्लुकोमावरील पेटंट रजिस्टर केले होते. त्याला १३ जानेवारी २०२१ रोजी पेटंट नोंदणी मिळाली.
हे संशोधन करत असताना त्यांनी अनेक नेत्ररोगतज्ज्ञांच्या भेटी घेत डोळ्यांना होणाऱ्या ग्लुकोमा आजारावर माहिती संकलित केली व त्यानुसार प्रयोगशाळेत नवीन प्रभावी फॉर्मुलेशन बनवण्यास सुरुवात केली व सातत्यपूर्ण प्रेयत्नाअंती यशस्वी व प्रभावी फॉर्मुलातीन बनवले व या संशोधनाला पेटंट मिळाले. या यशासाठी संस्थेचे ट्रस्टी, संस्थेचे प्राचार्य संजय क्षिरसागर, शिक्षकवृन्द व इतर कर्मचारी यांनी प्रा लड्ढा यांचे अभिनंदन केले आहे.