लंडन – कोरोना विषाणूचे संसर्ग शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेक पद्धती विकसित केल्या आहेत. आता कोविड-१९ च्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी ब्लड कांउट म्हणजे पूर्ण रक्त गणना चाचणी ही नवीन पद्धत शास्त्रज्ञांनी सुचविली आहे.
नेदरलँड्स रेडबॉड युनिव्हर्सिटीमधील मेडिकल सेंटरचे संशोधक आंद्रे व्हॅन डेर वीन म्हणाले की, ब्लड कांउटमुळे कोविड -१९ अधिक गंभीर किंवा सामान्य असल्याचे सांगितले जाऊ शकते. अशा अंदाजानुसार, आरोग्य कर्मचारी देखील रुग्णावर उपचार करू शकतील आणि शक्य तितक्या लवकर त्यांना संसर्गमुक्त होऊ शकेल. यासंबंधी 11 रुग्णालयांमध्ये केलेला हा अभ्यास ई-लाइफ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
संपूर्ण रक्ताची गणना (सीबीसी) चाचणीमध्ये, पेशींचे प्रकार (सेल प्रकार) आणि त्यांची संख्या याबद्दल माहिती उपलब्ध असते. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास काही रक्त पेशींचे वैशिष्ट्य निश्चित केले जाऊ शकते. तसेच या तंत्राचा वापर करून एक विश्वसनीय रोगप्रतिकारक गुण (स्कोअर) विकसित होऊ शकते. त्यामुळे संसर्गाची प्रकरणे गंभीर असतील की नाही ते दर्शविता येते. तसेच ही पध्दत उपचाराबाबत निर्णय घेण्यास आरोग्य तज्ज्ञाना व डॉक्टरांना मदत करू शकते.
संशोधकांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे केवळ रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागात दाखल केलेल्या कोरोना रूग्णाच्या रक्तपेशींचे तपशीलवार विश्लेषण केले जाते, आता कोविड -१९चे संक्रमण निश्चित होते, तेव्हा रक्त पेशींमध्ये विशिष्ट बदल दिसतात. रक्तपेशींमध्ये होणारे हे बदल विशेषत: नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केल्यानंतरच दिसून येतात.