मुंबई – व्हॉट्सएपवर ऑनलाईन दिसल्यामुळे बरेचदा अनेकांची अडचण होते. काही लोक बघतच असतात की एखादी व्यक्ती आनलाईन कधी येते. त्यामुळे बरेचदा काही खास लोकांसोबत किंवा कुटुंबियांसोबत चॅटिंग करायचे असेल तर त्यात अडथळा येतो. पण समोरच्यांना आपण आनलाईन आहोत असे दिसलेच नाही, तर? हो हे शक्य आहे.
आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सएपची एक खास ट्रीक सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही आफलाईन राहूनही चॅटिंग करू शकता. तेही दुसऱ्या कुणाच्या डिस्टर्बन्सशिवाय. खरे तर व्हॉट्सएपवर आनलाईन दिसण्याचे नुकसान हे आहे की इतरांना कळून जाते तुम्ही कुणासोबत तरी चॅटिंग करताय म्हणून. याशिवाय बरेचदा तुम्हाला आनलाईन बघताच अनेक लोक मेसेजेस टाकायला लागतात. त्यामुळे तुम्ही खालील प्रक्रिया करा आणि या त्रापासून वाचू शकता…
– गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला WA bubble for chat अॅप डाऊनलोड करा
– त्यानंतर हे अॅप परमिशन्स मागेल, ते सारे अलाऊ करा
– आता व्हॉट्सअपवर येणारे मेसेजेस तुम्हाला बबल्समध्ये येतील
– इथे चॅटिंग केल्यास तुम्ही कुणालाही आनलाईन दिसणार नाही
– आफलाईन राहूनही आरामात चॅटिंग करू शकता
– सोबतच तुमचे लास्ट सीनही कुणाला दिसणार नाही