सध्या लाईव्हचा जमाना आहे. गुगल मीट असेल, झूम असेल, फेसबुक लाईव्ह असेल, व्हाट्सअप वरून व्हिडिओ कॉल असेल अथवा इन्स्टाग्राम वरून लाईव्ह चॅट असेल …या सगळ्यात इंस्टाग्राम लाईव्ह आतापर्यंत थोडे मागे होते. परंतु त्यांनी ही कसर भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे अगदी आजपासूनच.
इंस्टाग्राम लाईव्ह सुरू केले की सलग फक्त एक तास करता यायचे. आता आजपासून ही मर्यादा इंस्टाग्रामने चार तासापर्यंत वाढवली आहे. म्हणजे तुम्ही एकदा लाईव्ह कॉल सुरू केलात की तो मध्ये खंडित न होता थेट चार तास चालू राहू शकतो. लॉकडाऊनच्या काळात कलाकार, शिक्षक, योगकेंद्र पासून कार्यालयीन कामसापर्यंत सर्वांनीच ‘लाईव्ह स्ट्रीमिंग ‘चा फायदा घेतला .अमेरिकेत कोरोनाच्या काळामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग च्या वापरात ७० टक्के वाढ झाली. जगभरात साधारण हाच ट्रेंड आहे.
(ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्या तरंग या ब्लॉगवरुन साभार)
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011