मुंबई – फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामने आपल्या युझर्ससाठी एक जबरदस्त फिचर आणले आहे. हे फिचर तुम्हाला केवळ डिलीट झालेली पोस्ट वाचण्याचीच सुविधा देत नाही, तर ही पोस्ट रिस्टोअर करण्याचीही संधीही देते.
इन्स्टाग्राम स्टोरीज चोवीस तासांत डिलीट होते आणि तुम्हाला वाटले तर ३० दिवसांच्या आत तुम्ही रिस्टोअर करू शकता. मात्र नव्या फिचरमुळे युझर्सला ३० दिवसांची प्रतिक्षा करण्याची गरज नाही. कारण आता २४ तासांच्या आतच आपल्या स्टोरीज रिस्टोअर करता येणार आहे. इन्स्टाग्रामने आपल्या ब्लॉगवर या फिचरची माहिती दिली आहे. अॅप अपडेट केल्यानंतर युझर्स आपले डिलीट केलेल्या पोस्ट बघू शकणार आहेत आणि रिस्टोअरही करू शकणार आहेत.
सध्या हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध नसले तरीही लवकरच युझर्सला त्याचा लाभ मिळणार आहे. हे फिचर वापरणे अत्यंत सोपे आहे. फोटो, व्हिडीओ, रिल्स आणि आयजीटीव्ही व्हिडीयोसाठी हे फिचक काम करणार आहे. डिलीट केलेली पोस्ट बघायची किंवा रिस्टोर करायची असेल तर इन्स्टाग्रामच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल. तिथे अकाऊंटमध्ये जाऊन रिसेंट्ली डिलीटेड या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही रिस्टोअर करू शकता.