नाशिक – व्यायाम करीत असतांना बेशुध्द पडल्याने ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गोल्फ क्लब मैदानावर घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्यामसुंदर हरिहर तालुकदार (६७ रा. न्युक्लिअर स्मार्ट सोसायटी, भाभानगर) असे मृत इसमाचे नाव आहे. तालुकदार शुक्रवारी (दि.२) नेहमीप्रमाणे व्यायामासाठी गोल्फ क्लब मैदानावर गेले होेते. व्यायाम करीत असतांना अचानक ते बेशुध्द पडले. ही बाब उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले.