नाशिक – येथील एबीबी कंपनीने नवीन जागतिक विविधता आणि समावेशक धोरणाला सुरुवात केली असून त्याद्वारे पुढील दहा वर्षांत जगभरात महिला व्यवस्थापकांचे प्रमाण दुप्पट केले जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या १२.५ टक्क्यांहून वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांवर असलेल्या २५ टक्के महिलांपर्यंत हे धोरण पोहोचवणे यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्यातील समानता वाढविण्याच्या उद्दीष्टाने कर्मचार्यांना सर्वसमावेशक नेतृत्व प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रोग्रामिंगचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देखील महिलांना मिळणार आहे. विविधता आणि समावेशाची संस्कृती वाढवणे आणि त्याचा विकास करणे हे कंपनीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, व्यवसायातील कार्यक्षमता सुधारण्यासाठी याकडे संधी म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे मत एबीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जर्जन रोजेंग्रेन यांनी व्यक्त केले आहे. अलीकडेच, कंपनीने औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील ५० पेक्षा जास्त युरोपियन कंपन्यांसोबत काम करण्यासाठी करार केला आहे.