शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

व्यक्तीविशेष – सारंग घोलप यांची कॅनव्हास पेंटिंग (पोट्रेट)

by India Darpan
सप्टेंबर 25, 2020 | 1:51 pm
in इतर
9
IMG 20200925 WA0044 e1601041877408

IMG 20200925 WA0045

निसर्गत:च प्रत्येकात काहीनाकाही वेगळेपण असतं. जे प्रत्येकाच्या जीवनाला पोषक आणि  उपकारकच ठरतं. तसंच माणसाचंही असतं. प्रत्येक माणसात वेगवेगळ्या क्षमता असतात.त्या क्षमतांचा शोध किंवा बोध प्रत्येकालाच होईल असे नाही. फार थोड्या व्यक्तींना स्वत:तलं वल्लीपण वेगळेपण बालपणापासून खुणवत असतं. हळूहळू त्यालाही त्याचा शोध लागत जातो. अशी माणसं स्वत:ला घडवत जातात. लढवत राहतात. म्हणून ती घडतात. स्वत:ला सिद्ध करतात.कलावंत म्हणून नावारूपाला येतात. स्वत:चं वेगळं विश्व निर्माण करतात. स्वत:ची वेगळी ओळख बनवतात. कला नेहमी माणसाला आनंद बहाल करते. फक्त तिची साधना कलावंत म्हणून प्रामाणीकपणे केली पाहिजे. कलेमुळे कलाकार जन्मला येतो कोणताही कलावंत साहित्यिक, नाटककार ,कवी, गीतकार, संगीतकार यांच्या कलाकृतीचे दर्शन आपल्याला नेहमी नंतर होते.जसं मुल गर्भात जन्म घेतं तेव्हा पासून आईला त्याची जाणीव होते. जन्मानंतर इतरांना त्याचं दर्शन होतं. अगदी तसंच चित्रकार व इतर कलाकारांचं होत असतं. त्यांच्या कलाकृतींनी आकार,रूप,स्वरूप घेतल्यावर त्या कलाकृतीची ओळख आपणास होते.परंतु गर्भातील मुलासारखाच कलाकृतीचा जन्म कलाकाराच्या काळजात … मनात अगोदर झालेला असतो. कलासक्त मन हे आनंदी जीवनाचं द्योतक असतं. कलावंताची श्रीमंती ही त्याच्या कलेत असते. कला कलावंताला एका उंचीवर नेण्यास नक्कीच मदत करते. त्याच्या व्यक्तिमत्वाला उंची बहाल करते. चारचौघात नाव देते, मानसन्मान देते. अशाच एका कलावंताची ओळख आज आपणास ’ व्यक्ती विशेष ’ सदरातून करून देत आहे.

रंगाची भाषा काळजात जपणारा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील कलावंत म्हणजे सारंग घोलप. नावात सहा रंग असले तरी सप्तरांगाचं ज्ञान बालपणातच मिळालेलं व्यक्तित्व … म्हणजे सारंग घोलप. सदैव हसतमुख असलेला हा कलावंत. एक आवलिया रंगकर्मी. कादवा साखर कारखाना कार्यस्थळावरील बी.के. कावळे माध्य.व उच्च माध्यमिक  विद्यालयात विद्यार्थी प्रिय शिक्षक. विशेष म्हणजे वीस वर्षे माझे सहकारी शिक्षकमित्र. त्यांना रंगाचं भान विद्यार्थी दसेपासून लाभलं असावं. आईवडिलांना त्यांचे मुलाचे पाय पाळण्यात नक्कीच  दिसले असावे. म्हणून तर त्यांचं नाव  सारंग ठेवलं. सारंग घोलप जसजसे मोठे  होत गेले. तसे त्यांनी  आपल्या नावाकडे गांभीर्याने पाहिलं असावं. आपल्या नावात रंग आहे. याचा त्यांना जेव्हा जाणीव झाली असावी. तेव्हा नावाचा अन्वायर्थ लवण्याचा त्यांच्या बालमनाने नक्कीच प्रयत्न केला असेल. त्याचाच परिपाक म्हणून शालेय जीवनात चित्रकलेकडे मन आकर्षित झालं.पहिल्या दुस-या वर्गातच पोपट चिमणीचे खापरपाटीवर चित्र काढण्यास सुरवात केली. त्यांच्या या गुणाची पारख केली ती उदार गुरुजींनी. पुढे मोहाडीला माध्यमिक विद्यालयात भा.वा.जाधव या हाडाच्या चित्रकार शिक्षकाने सारंग यांच्या आयुष्यात सप्तरंग भरले. शिक्षक असलेले ज्येष्ठ बंधू साहेबराव यांनी पुढे त्यांना चित्रकला महाविद्यालयात शिकण्यासाठी पाठविले. त्यांनी बीडच्या कैलास कला निकेतन मधून ए.टी.डी.केले.कॉलेजचे प्राचार्य एस.एस.शिंदे हे आडगाव(नाशिक)चे राहणारे होते. ते स्वत:च राष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकर्मी होते. गावाकडचा म्हणून त्यांनी जीव लावून घोलपांवर पैलू पाडले. सारंग घोलप यांनी नंतर डीप.ए.एड; ए.एम; आणि जी.डी.आर्ट केले.

चित्रकर्मी सारंग घोलप यांनी कॅनव्हास पेंटिंग (पोट्रेट) प्रकारामध्ये स्वत:च्या नावाला एक वलय निर्माण केलं आहे. महाराष्ट्र,मध्यप्रदेश पाठोपाठ गुजरातमध्ये त्यांची कॅनव्हास पेंटिंग पोहोचली. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, संगीतक्षेत्रातील ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल यांचे कॅनव्हास पेंटिंग त्यांच्या बैठकीत सन्मानाने विराजमान झालं आहे. सुरगाण्याचे भाचे आणि सातारचे राजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कॅनव्हास पेंटिंग  बनविले. ते कॅनव्हास पेंटिंग सातारच्या राजमहालात चित्रकलामहर्षी रवी वर्मा यांच्या चित्रांच्या पंगतीत जावून बसले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय,धर्मवीर संभाजी या मालिकेतील सुप्रसिध्द कलावंत व लोकसभा सदस्य खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ सिनेकलावंत रवी पटवर्धन यांचे कॅनव्हास पेंटिंग बनवून त्यांची कौतुकाची थाप मिळविली आहे. आजही रविपटवर्धन अधूनमधून सारंग घोलप यांना दूरध्वनीवरून संवाद साधतात. अशी माणसं रंगाच्या प्रेमानं त्यांनी जोडली आहे. अशा या रंगांच्या साम्राज्यात रंगत गेलेल्या कलावंताने अनेकांचे कॅनव्हास पेंटिंग बनवून आनंदरंग उधळला आहे. विधान सभेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ ,कादवा कारखान्याचे माजी चेअरमन स्व.रामभाऊ डोखळे, अॅड.बाजीराव कावळे,महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष व कादवाचे विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे ,दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे आयुर्वेदाचार्य,ड.रवी आचर्य आदींसह हजारो कॅनव्हास पेंटिंग त्यांनी केले आहेत. व्यक्तिचित्र हा खास विषय घेऊन सांरग घोलप यांचे स्वत:सह इतरांच्या आयुष्याला रंग भरविण्याचे हे काम अविरतपणे चालू राहो.सांरग यांच्या सप्तरंगी जीवनाला खूप सा-या शुभेच्छा.

  • लक्ष्मण महाडिक,पिंपळगाव बसवंत

IMG 20200925 WA0050

 

 

 

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- १०४१ कोरोनामुक्त. १४६८ नवे बाधित. २६ मृत्यू

Next Post

मालेगावातील शेतपिकांचे तत्काळ पंचनामे करा; कृषीमंत्री भुसे यांचे आदेश

Next Post
64188f88 28f1 4b19 baa1 167a22ea9d01

मालेगावातील शेतपिकांचे तत्काळ पंचनामे करा; कृषीमंत्री भुसे यांचे आदेश

Comments 9

  1. विलास काशिनाथ शिंदे says:
    5 वर्षे ago

    अतिशय मोजक्या व निवडक शब्दात एका अवलिया चा परिचय करून दिला कलाकाराला आणि परिचय करून देणा-या लेखकाला ही पुढील कार्यास खूप खूप सदिच्छा!

    उत्तर
  2. Borse N .Z. says:
    5 वर्षे ago

    Very nice painting

    उत्तर
  3. Piyush padol says:
    5 वर्षे ago

    Very nice sir

    उत्तर
  4. Sanjay phalle says:
    5 वर्षे ago

    माझा वर्ग मित्र सारंग अतिशय मनमिळावू वप्रेमळ मनाचा एक चांगला चित्रकारच नाही तर त्याही पेक्षा तो एक चांगला माणूस आहे शालेय जीवनानंतर गेल्या माहिन्यात आमची २७वर्षा नंतर प्रथमच भेट झाली तरी तो बिलकुल बदलेला नव्हता असा हा एक मोठा सिद्ध हस्त चित्रकार माझा मित्र असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो

    उत्तर
  5. वंदना कदम-पवार says:
    5 वर्षे ago

    व्यक्तीच्या दिसण्यातील सूक्ष्म बारकावे सुद्धा आपल्या कुंचल्यातून साकारणारे घोलप सर म्हणजे अद्भुत रंगकर्मीच होय,कलेच्या देवतेचे वरदान लाभलेल्या या कलाकाराच्या भावी वाटचालीस सप्तरंगी शुभेच्छा

    उत्तर
  6. Kavita Baburao Bendake says:
    5 वर्षे ago

    Nice painting sir

    उत्तर
  7. B M Wagh Assistant Head Master Madhavrao Boraste Vidyalaya Ozar mig says:
    5 वर्षे ago

    Khup Chhan Kam ahe Gholap siranche

    उत्तर
  8. जगदीश माणिकराव बोराडे says:
    5 वर्षे ago

    अस्सल चित्रकाराच सुंदर आटोपशीर, नेमकं शब्दचित्र..

    उत्तर
  9. Jadhav Shobha Shivaji says:
    5 वर्षे ago

    You are really very realistic painter having great sense of painting.Live picture and painting is your rare quality .Have the best luck for better future.We are proud of you Sir.

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांचा १० लाखाच्या ऐवजावर डल्ला…वडाळा पाथर्डी मार्गावरील घटना

मे 9, 2025
GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011