टी.सी. पवार उर्फ त्रिंबक पवार अभियांत्रिकी मधील एक नावाजलेले नाव. त्यांचे ३१ ऑगस्ट रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले. टीसी याच नावाने ते ओळखले जात. सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून ते निवृत्त झाले. पण, त्यांची कामगिरी सदैव स्मरणात राहणारी आहे. टीसीचे मुळ गाव धुळे जिल्हातील निमगुळ येथे त्यांनी गर्व्हमेंट पॅालीटेक्नीकल महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर ते नोकरी साठी नाशिकला आले. त्यांच्या गुणवत्ते मुळे,व प्रेमळ स्वभावाने त्यांनी नाशिकला आपले केले. त्यांचे अभियांत्रीकी मधील कार्य नेहमीच स्मरणात राहिल असेच होते.
– वैद्य विक्रांत जाधव
टीसी यांनी आपली नोकरी धुळे व नाशिक परिसरातच केली. त्यामुळे नाशिक व धुळे जिल्हा हा त्याच्या विशेष अभ्यासाचा विषय राहिला. अनेकांशी मैत्री, दांडगा लोकसंपर्क, वैशिष्ठ्यसंपन्न बोलणे ,थेट अचूक मनमिळाऊ बोलण्यामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. टीसी यांनी दोन पिढ्या घडवल्या असे म्हटल्यास गैर नाही. आपल्या कुटुंबातील सदस्य यांना संस्कार देऊन उत्तम शिक्षण दिले. सरकारी उच्च पदावर जाण्यासाठी सहाय केले, ध्येय ठरवून दिले. आपल्या सहा मुलींचे लग्न केले. देश,राज्यावरील श्रद्धा व सेवा वृत्ती मुळे. एका बाजूने आपली सरकारी जबाबदारी आणि कुटुंब स्थिर करताना त्यांनी सामाजिक बांधिलकी शेवट पर्यंत जपली. त्यांनी शेवट पर्यंत अनेकांना मदत केली. हनुमान नगरच्या बळीमंदीरासाठी मदत मागायला नगरसेवक गेल्यानंतर त्यांनी मदत तर केलीच पण, मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत ते थांबले. मंदिराच्या जिर्णोध्दार सोहळ्याला प्रसाद वाटण्याचा आनंदही त्यांनी घेतला. त्यांच्या मुळगावी देवीचे मंदिर देखील स्वखर्चाने बांधुन दिले.
मोहन या मुलाला स्थिर करतांनी त्यांनी तीन व्यावसायिक शोरूम ( EICHER / HYUNDAI ) स्वत बांधले. स्वत केले म्हणजे कळते असे ते सतत सांगत. शिस्त लावतांना कधीही आपला त्यांनी आपला कडकपणा कधी दाखवला नाही. तसेच आपल्या नातवंडांना डॉक्टर, इंजिनियर आणि इतर क्षेत्रामध्ये जाण्यासााठी त्यांनी प्रोत्साहन दिले. सर्वांना समान वागणुक अशा विचारचे ते होते. टीसी शेवट पर्यंत आपल्या व्यक्ती सोबत राहिले. नोकरीत असतांना अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी योगेश सहकारी रहिवाशी संस्था बांधायला घेतली, तिच्या बांधणी पासून तें शेवटच्या श्वासा पर्यंत तेथेच राहिले. त्या संस्थेचे ते पालकच होते. संस्थेतील सर्व कुटुंबांना पवार काका हा शब्द देखील आधार होता. शरणपूर रस्त्यावरील वृत्तपत्र विक्रेत्यांशी गप्पा मारीत त्यांची आस्थे ने चौकशी करीत, त्यांना सल्ला देत, पण वेळ आल्यास मदतही करत. जमीन आणि शेती यांची आवड तर होतीच पण उत्तम अभ्यास असल्याने ते अनेकांचे गुरु होते. असे टीसी पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या आठवणी नेहमी स्मरणात राहिल अशाच आहे……