चांदवड – व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था आणिचांदवड एक गाव या ग्रुपच्यावतीने घरगुती गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक वितरण व कोविड योद्धा सन्मान समारंभ संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक अशोक व्यवहारे होते. चेअरमन दिपक व्यवहारे यांनी प्रास्ताविकात संस्थेचा परिचय करून दिला. चांदवड एक गाव या सोशल मीडिया ग्रुपचे अॅडमीन अक्षय गुजराथी यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करीत आपल्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी मुख्याधिकारी अभिजित कदम, डॉ आदित्य निकम, डॉ. जीवन देशमुख, डॉ. राजश्री राजगुरू, डॉ. धवल गुजराथी, प्रशासकीय अधिकारी राजपूत, इंजिनीअर चौधरी यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत कांचन संतोष सोनवणे (प्रथम), देविदास शिवराम हिरे (द्वितीय), सागर आहेर (तृतीय) व अश्विनी प्रफुल्ल सोनवणे आणि कैलास किसन वाघ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष किशोर व्यवहारे,अनिता व्यवहारे,रमेशशेठ व्यवहारे,रमेशशेठ जाधव, मुश्ताक शेख,पांडुरंग जाधव, व्यवस्थापक संतोष सुतारे, अक्षय राऊत,विशाल ललवाणी, शामली परदेशी, कांचन परदेशी, अपर्णा अहिरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विष्णू थोरे यांनी केले.